नाशिक : प्रतिनिधी
`प्रत्येक घरात एक तरी निसर्गोपचार तज्ज्ञ हवाच’ असे प्रतिपादन प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत चालणाऱ्या `निसर्ग विद्या निकेतन’तर्फे शुक्रवारी (दि.19) निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून योग व ॲक्युप्रेशर या विषयांचा प्रात्यक्षिक वर्ग पार पडला. याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते.

यावेळी संस्थेचे प्रमुख रणजित पाटील व सुनिता पाटील, प्रा. तस्मिना शेख, तसेच प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते व प्रा. पुरुषोत्तम सावंत उपस्थित होते.

प्रा. सिन्नरकर यांनी सद्यस्थितीत निसर्गोपचाराची गरज विशद केली. तसेच योगशास्त्रात सांगितलेल्या शुध्दीक्रियांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ज्यात प्रा. सिन्नरकर यांनी स्वत: दंडधौती, सूत्रनेती, जलनेती यांचे प्रात्यक्षिक केले व विद्यार्थ्यांकडून करवूनसुध्दा घेतले. त्यानंतर प्रा. तस्मिना शेख यांनी ॲक्युप्रेशर या विषयाचे प्रात्यक्षिक घेतले. यू. के. अहिरे यांनी आभार मानले.
—
