नाशिक मिरर  : त्र्यंबक-गंगापूर लिंक रोडवरील सुला वाईन सर्कल ते बारदानफाटा दरम्यान चे रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम दि.९ नोव्हेंबर मंगळवार रोजी राबविण्यात आली.

रहदारी अडथळा ठरत असल्या बाबत चे सविस्तर वृत्त ‘नाशिक मिरर’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.त्याची दखल घेऊन सदर मोहीम राबविण्यात आली. सुला वाईन सर्कल ते बारदान फाटा दरम्यान १०० रस्ता मंजूर आहे. सदर रस्ता सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती ला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने सदर रस्ता चे रूंदीकरण करून दुभाजक टाकण्याची मागणी नागरिक व स्थानिक नगरसेवकांकडून सातत्याने होत होती.

त्यामुळे सदर रस्तावर दुभाजकाचे व रस्ता रुंदीकरण चे काम मंजूर झाले.परंतु रस्ता रुंदीकरण न करता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले.त्यामुळे अरुंद रस्ता अधिकच अरुंद झाला. मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रोज ट्रॅफिक जाम व छोटे-मोठे अपघात होत होते.त्यामुळे नाशिक मिरर न्यूज पोर्टल वर सविस्तर बातमी प्रसिद्ध करून अगोदर रस्त्या रुंदीकरणास अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करून त्या नंतर दुभाजकाचे काम करण्याची मागणी नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेऊन रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारे कंपाउंड ,कच्चे व पक्के विटाचे व पत्र्याचे बांधकामे, रस्ता लगत असणाऱ्या टपऱ्या आदी हटवण्यात आले.

सदर मोहिमेमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी १५ पोलीस अधिकारी व कर्मचारी , ५० सिडको व सातपूर मनपा विभागीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, जप्त करण्यात आलेले सामान वाहण्या साठी चार वाहने, एक जेसीबी असा फौजफाटा तैनात होतो. यावेळी मनपा उपायुक्त अतिक्रमण करुणा डहाळे, सुभाष आहेर , सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर ,अतिक्रमण अधीक्षक शिवाजी काळे, सामान्य प्रशासनाचे तानाजी निगळ, सर्व विद्युत विभागातील कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, नगररचना विभागाचे कर्मचारी, उपस्थित होते.

कारवाई मध्ये अमृत गार्डन ते बारदान फाटा नागरिकांनी काही ठिकाणी अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. तसेच मनपा विभागाला सहकार्य केले. तर काही ठिकाणी अतिक्रमण काढत असताना काही पूर्वसूचना दिल्या नाहीत म्हणून नाराजी व्यक्त केली तर काही ठिकाणी अतिक्रमण हटवते वेळी वादही झाल्याचे दिसून आले.

बातम्या

Don`t copy text!