नाशिक मिरर वेबटीम : सन १९९९ पासुन ते आजपर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कार चा मान सन्मान ठेवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ते म्हणजे सातपुर चे पत्रकार ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे यांनी,मूळचे पिंप्री जि.बुलढाणा येथील असलेले लहान पणा पासूनच समाजसेवेची व विविध स्पर्धा व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची त्याची आवड असल्याने ज्ञानेश्वर यांनी आजपर्यंत मिळालेल्या शेकडो पुरस्काराचा संग्रह करून ठेवला आहे.1999 ते 2000 शालेय जीवनात पहिला पुरस्कार, त्यानंतर 2005 पर्यंत शालेय जीवनात आदर्श विद्यार्थी म्हणून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विविध सन्मान पत्र प्राप्त केले आहेत.तसेच 2005 ते 2021 पर्यंत शालेय जीवनापासून तर पत्रकारितेच्या चालू घडामोडी तील जीवनात जन माणसांनी जनसामान्यांनी जनतेने पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान केला आहे .सन्मान ,लहान असो की मोठा हा सन्मान असतो सन्मान स्वीकारताना लहान किंवा मोठा याचा विचार करायचा नसतो ,कारणतो हृदया पासून देणारी व्यक्ती सन्मान देत असते . पुरस्कार आपण मागायला जात नाही, काम करतो त्याची मिळालेली ती एक पावती असते. सत्य ,निर्भिड ,आवाज जनतेचा विश्वास जनतेचा पत्रकार जनतेचा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून निर्भीडपणे जनतेसाठी काम करतो ,मी तो पत्रकार आहे असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.उदाहरण सांगायचे तर,पिंपरी आंधळे येथील त्यांनी एक बातमी केली होती.एका बातमीमध्ये सामान्य महिलांची बातमी करून तिला न्याय दिला होतो.असा आवाज जनतेचा आहे विश्वास जनतेचा म्हणूनच पुरस्काराला नकार द्यायचा नसतो, आनंदाने पुरस्काराचा स्वीकार करायचा असतो, म्हणून सन्मान हा सन्मान असतो . ज्ञानेश्वर हे सातपुर एम आयडीसी येथील संतोषी माता मंदिराचे ब्रह्मलीन शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र देखील आहेत.सर्वांशी ते प्रेमाणे ,आदराने ,जिव्हाळ्याने मैत्रीपूर्ण स्वरुपात वावरत असतात.म्हणून त्यांना सगळीकडे माऊली या नावाने संबोधले जाते.त्यांच्या कार्याला नाशिक मिररचा सलाम!

