पालखेड मिरचिचे (वार्ताहर ): गेल्या काहि कालखंडात तालुक्यातील सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले कर्मवीरांच्या त्यागातुन निसाका ,रासाका या संस्था उभ्या राहिल्या असतांना त्या काहि कारणाने बंद पडल्या त्या पुन्हा सुरू होण्यासाठी ज्या पद्धतीने संबधित विभागाकडे पाठपुरावा व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही म्हणून या सहकारी संस्था बंद राहिल्याने ऊसउत्पादकांसह,मजुर ,कामगार,छोटे मोठे व्यवसायिक यांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली रस्ते ,विज,पाणी या मुलभुत गरजांपासुन व विविध विकास कामांपासुन तालुका काहि वर्ष मागे गेला पुन्हा नव्याने सहकार क्षेत्र व विविध कामे सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे याचेच उदाहरण म्हणजे गेल्या सहा वर्षांपासुन बंद असलेला रासाका होय महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळत रासाका सुरू करून दाखवला त्याचप्रमाणे कायद्यात बदल करून निसाका चालु करण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातुन मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी दिले ते कुंभारी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भुमिपुजन प्रसंगी आपल्या मनोगतातुन बोलत होते.

व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे,जि.प.सदस्या मंदाकिनी बनकर अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे,राजेंद्र बोरगुडे ,बाळासाहेब बनकर,माधव ढोमसे,बाबासाहेब शिंदे,विलास वाघ, बाळासाहेब वाघ,गणेश ढोमसे,रविंद्र कोकाटे ,मोहन जाधव ,बापु गडाख,आदि मान्यवर उपस्थित होते

बनकर पुढे म्हणाले की गेल्या दोन वर्षांपुर्वी तालुक्यातील जनतेने विविध कामे करण्याची संधी दिली ती जबाबदारी स्विकारत तालुक्यातील मुख्ख रस्त्यांची झालेली वाताहत दुरस्त करत इतरही कोट्यावधी रूपयाचे विविध विकास कामे साकारत आहे शेतकर्यांना विजेचा प्रश्न प्रामुख्खाने भेडसावत असल्याने येत्या काहिदिवसात वावी येथील 220 के.व्ही.चे सबस्टेशन कार्यन्वित करून पुर्ण क्षमतेने शेतकर्यांना विजेचा पुरवठा उपलब्ध होणार आहे शेतीपिकांना पाणी देण्यासाठी दिवसा कायमस्वरूपी विजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ना.शरदचंद्रपवार साहेंबाकडे पाठपुरावा सुरू आहे तालुक्यातील जनतेला काय पाहिजे हे ओळखून तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार निधीसह जि.प .शेषमधुन माध्यमातून आत्तापर्यंत कोट्यवधींचीविकास कामे मार्गी लावली आहे. येत्या काळातही आमदारकीच्या माध्यमातून निफाड तालुक्यासह प्रत्येक गावाचा सर्वागीण विकास साधणार असल्याची ग्वाही आमदार बनकर यांनी यावेळी दिली.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी आपल्या भाषणात विकासाचे ध्येय असणारा लोकप्रतिनिधी आमदार दिलीप बनकर यांच्या रूपाने निफाडकराना मिळाला असून निश्चितच निफाड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईन असे प्रतिपादन केले

आमदार निधी व जिल्हा परिषद शेषमधुन कुंभारी  रस्त्यांचे लोकार्पण व भुमिपुजन व विविध विकास कामाचे लोकार्पण

आमदार निधी व जिल्हा परिषद शेषमधुन कुंभारी गावाला जोडणार्या सर्वच रस्त्यांचे लोकार्पण व भुमिपुजन व विविध विकास कामाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले याप्रसंगी सरपंच राजेंद्र जाधव  उपसरपंच शैला जाधव ,सोसायटीचे चेअरमन रामदास जाधव व्हाचेअरमन उत्तम झेटे बाळासाहेब मोते, भानुदास जाधव,भाऊसाहेब जाधव ,पोपट जाधव ,वासुदेव घगाळे , चंद्रकांत झेंटे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब घगाळे,बाळकृष्ण घंगाळे, ज्ञानेश्वर घंगाळे ,प्रकाश जाधव,संजय जाधव ,बाळासाहेब झेटे, सचिन जाधव,संतोष नरुडे ,बबनराव शेजवळ ,एकनाथ जाधव, उत्तम जाधव, शरद घंगाळे, गणेश जाधव, लक्ष्मण जाधव, ,नितीन जाधव.,दीपक जाधव,त्रंबक घगाळे,राजाभाऊ झेंटे,नाना घगाळे,एकनाथ जाधव, दतु जाधव राष्ट्रवादी विद्यार्थीचे शहराध्यक्ष राहुल जाधव जयराम जाधव,संतोष जाधव,दिपक जाधव , दिलीप जाधव,सुनिल जाधव,मनोज जाधव,अतुल चव्हाण, आदींसह कुंभारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातम्या

Don`t copy text!