सातपूर : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेवुन रॉकेल टाकून पेटवून पत्नीला जीवे ठार मारणारऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

नाशिक मिरर वेबटीम : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेवुन भांडणतंटा करुन रॉकेल टाकून पेटवून पत्नीला जीवे ठार मारणारऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी समशेर अबुलेश देवांग (साय)वय ३६ रा.मुळ बहेरिया बिहार लॉन्ड्री जवळ हा नेपाळचा रहिवासी असलेला वॉचमन सातपूरच्या धृवनगरच्या अदिती कन्सट्रक्शन येथे पत्नी आयेशा खातून समशेर साय वय ३८ हिचेसह रहात होता.
तो नेहमीच पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत भांडण करीत असे.
मात्र दि.१२ जून २०१८ रोजी या बांधकामाच्या ठिकाणी कोणीही नसल्याचे पाहुन पत्नी आयेशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ( रॉकेल ) ओतून अंगावर पेटती माचिस काडी टाकून त्याने जाळुन जीवे ठार मारले होते.
या घटनेबाबत गंगापुर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संशयित आरोपी विरोधात नाशिकच्या सत्र न्यायालयाचे न्यायाधिश ए एस वागवसे यांच्या पुढे खटला सुरु होता.काल न्यायालयाने साक्ष पुरावे तपासुन दोषी ठरवत १००० रू.दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदर व तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे,पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय माळी,हवा.सचिन सुपले, कोर्ट अंमलदार यशवंत पवार,धनश्री हासे आदिंचे सहकार्य लाभले.

बातम्या

Don`t copy text!