नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वाहतीमध्ये घंटागाडीखाली सापडून बावीस वर्षीय युवती ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि.१७ रोजी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान मित्रासोबत जॉगिंग ला गेलेली युवती रोशनी केदारनाथ जयस्वाल (वय २२ वर्ष रा.कामगार नगर पाईप लाईन रोड ) ग्लेनमार्क कंपनी समोरील रस्त्यावर रनींग करताना एका नादुरुस्त घंटागाडीला टोचन लावून चालेली घंटा गाडी च्या मागच्या नादुरुस्त गाडी खाली सापडली व तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्या मुळे उपचारासाठी रुग्णालयात नेते वेळीच युवती चा मृत्यू झाला आहे.सदर घंटागाडी चे चालकासह दोन कर्मचारी पोलिसांना ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!