नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील उद्योजकाची संघटना असलेलि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन( निमा)गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीवरून जिल्हा भरात औद्योगिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होतो.परंतु आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून निमावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळणार आहे.सह धर्मदाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी ही नियुक्ती केली आहे . आता निमा चा कारभार असिस्टंट चँरिटी कमिशनर राम लिपटे, चँरिटी निरीक्षक पंडितराव झाडे व अँड. देवेंद्र शोरोडे( धुळे ) हे निमा चे कामकाज बघणार आहे.निमा च्या निवडणुकीवरून हा वाद थेट न्यायालय व त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयात पोहोचला होता . त्यानंतर अगोदर दिलेल्या निकालातच प्रशासक बसवण्याचे संकेत दिले होते.यामुळे आता ही नियुक्ती झाली असून ,निमाच्या संघर्ष करणाऱ्या दोन्ही गटांना हा धक्का बसला आहे.प्रशासकीय मंडळ कशा प्रकारे निमा चे कामकाज बघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
