पालखेड मिरचिचे (नाशिक मिरर वृत्तसेवा, प्रतिनिधी) : निफाड तालुक्याच्या उत्तरपुर्व परिसरात काल दिनांक 6 आक्टेबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी दाटुन वादळी वार्यासह काहि वेळाकरीता गारपिट झाली या गारपिटनेे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसामुळे व गारपिटने कुंभारी परिसरातील प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष बागा सोबत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांनी नुकसानग्रस्त द्राक्षउत्पादकांच्या बांधावर जाऊन प्रशासनाला दिल्या याप्रसंगी तहसीलदार श्री.शरद घोरपडे व तालुका कृषी अधिकारी बटू पाटील,मंडळ अधिकारी शितल कुयटे कृषीसहाय्यक कांबळे, तलाटि विठ्ठल पोटरे ग्रामसेवक भरत कदम कुंभारीचे सरपंच राजेंद्र जाधव उपस्थित होते
निफाड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ढगाळ वातावरणासह काहि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहे त्यातच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने व गारपिटने द्राक्षपिकांसह इतर पिकांना झोडपल्यामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत लाखो रुपये खर्च करून काबाडकष्ट करत पिकवलेल्या द्राक्ष पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुरवातीला छाटणी करून दोन पैसे अधिक मिळतील या उद्देशाने उत्पादकांनी द्राक्षपिकांची लवकर छाटणी केली छाटणी केलेल्या झाडांवरील नविन फुटव्याला या गारपिटाचा सर्वाधिक फटका बसला आहे हाता तोडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी अवकाळी, मागील वर्षी कोरोना महामारी मुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच या वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षा सोबतच खरीप हंगामातील सोयाबिन ,मका आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी लवकरात लवकर पंचनामे करावे आणि अहवाल सादर करावा अशा सूचना निफाड तालुक्यातील संबंधित अधिकारी वर्गाला आमदार बनकर यांनी यावेळी केल्या आहेत कुभारी येथील शेतकरी जयराम जाधव ,वाळु नाना जाधव ,नितिन विलास जाधव ,भानुदास पर्बत जाधव ,रघुनाथ जाधव,कचरू एकनाथ जाधव,पुंडलिक कारभारी जाधव,आदि उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रसंगी नुकसानग्रस्त द्राक्षउत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गारपिटने जखम झालेल्या झाडांवरील नविन फुटी काढुन तात्काळ उपाययोजना म्हणुन बाह्यस्पर्शी व आंतरप्रवाहि बुरशीनाशकांची फवारणी करावी ठिबक सिंचनद्वारे विविध प्रकारचे बुरशीचे जिवाणु सोडवे ज्यामुळे पांढरीमुळे सक्षमपणे कार्यरत होईल झाडांवरील गारपिटग्रस्त नविन फुटी बागेबाहेर काढुन टाकाव्यात व बागेताल पाण्याचा निचरा होईल याबाबींकडे लक्ष द्वावे.
मनोहर थेटे पाटिल
(संचालक द्राक्षबागायतदार संघ नाशिक विभाग)
