नाशिक मिरर :

अशोकनगर येथील राज्यकर्मचारी वसाहती मधील शिवाजी दुकले या आदर्श कामगारांची कन्या जयश्री दुकले- कऱ्हे गुरुवारी (ता. १५) कोण होणार मराठी करोडपती’ या कार्यक्रमात हॉटसीटवर बसण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धतुन तिने १२ लाख रुपये जिंकले आहे.जयश्री दुकले नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटमध्ये वैज्ञानिक अधिकारी आहेत.

 

व्हीआयपी कंपनीतील आदर्श कामगार म्हणून परिचित असलेले शिवाजी दुकले अशोकनगर येथील राज्य कर्मचारी सोसायटीत राहतात. मुलगा मनोज, तर दीपाली व जयश्री या दोन मुली आहेत. जयश्री सर्वांत लहान असून, तिने शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ‘म्हाडा’मध्ये नोकरी मिळविली. नंतर महाराष्ट्र पोलिस विभागात परीक्षा देऊन त्यातही यश मिळवले. तिचा नुकताच मेसेनखेडे येथील सोपान कऱ्हे यांचे पुत्र जयेश यांच्याशी विवाह झाला आहे. कोण होणार मराठी करोडपती या कार्यक्रमात पोचण्यासाठी त्यांनी प्रचंड तयारी केली होती. त्यासाठी भाऊ मनोज व माउली अभ्यासिकेच्या मनीषा निकुंभ यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. या यशामुळे सातपूरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेल्याने नगरसेवक शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, विक्रम नागरे, पल्लवी पाटील यांनी अभिनंदन केले.

बातम्या

Don`t copy text!