नाशिक मिरर वृत्तसेवा:
मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल व स्व. पैलवान सुकदेव नागरे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मॉडन एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, अशोक नगर येथे करण्यात आले होते.
या शिबिरात इयत्ता सहावी ते दहावीतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे एकूण आरोग्य, वजन-उंची, डोळे तपासणी तसेच सामान्य आजारांची पडताळणी करण्यात आली. आरोग्यप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या आरोग्य शिबिरासाठी मोतीवाला कॉलेजच्या वतीने डॉ. स्वानंद शुक्ला, डॉ. सुनील भालेराव, डॉ.पुनम हिरे, अझहर सर व हॉस्पिटल मधील 40 डॉक्टरांचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिराला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाचे आयोजन लक्ष्मी विष्णुपंत नागरे व इंजि.प्रवीण विष्णुपंत नागरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय पैलवान सुकदेव नागरे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिमन्यू गुडघे पाटील, सचिन उशीर, राहुल पाटील, पै. पंकज नागरे, अमोल पाटील, मनीष नागरे,अजिंक्य घुगे, रोहित नागरे, कृष्णा नागरे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक डॉ.अनिल माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा सामाजिक उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.
