नाशिक मिरर :सागर आनप

राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांबाबत अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (15 डिसेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अचानक निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्याने, महापालिका निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आयोगाने हिरवा कंदील दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

⏳ 29 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित

राज्यात सध्या एकूण 29 महानगरपालिका निवडणुका प्रलंबित होत्या. यासोबतच नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही रखडल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण व प्रशासकीय तयारी पूर्ण करत आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली.

📍 उत्तर महाराष्ट्रातील महापालिका व जागा

नाशिक महानगरपालिका – 122 जागा

अहिल्यानगर महानगरपालिका – 68 जागा

धुळे महानगरपालिका – 74 जागा

जळगाव महानगरपालिका – 75 जागा

मालेगाव महानगरपालिका – 84 जागा

🗓️ निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर

छाननी : 31 डिसेंबर

माघार घेण्याची अंतिम तारीख : 2 जानेवारी

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी

मतदान : 15 जानेवारी

मतमोजणी : 16 जानेवारी

🚨 आचारसंहिता लागू

महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेवर मर्यादा येणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार रणनिती यावर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

बातम्या

Don`t copy text!