निफाड : पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव हायस्कूलचे राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) अधिकारी नितीन डोखळे यांना महाराष्ट्र राज्य एन.सी.सी. वेल्फेअर बोर्ड संघटनेतर्फे राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट एन.सी.सी. अधिकारी – २०२५’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
या गौरव सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा मंगला जाधव, उपाध्यक्ष भास्कर बनकर, सेक्रेटरी अविनाश देशमाने, संयुक्त सेक्रेटरी अरुण महाले, शिक्षक नेते शिवाजी निंबळे, माजी एन.सी.सी. अधिकारी आर. डी. जाधव, विद्यालयाचे ब्रिगेडियर शिरिष डोखळे, कॅप्टन मनोज भामरे, प्राचार्य सुमन सिंग, प्रमोद जगताप, विदुला साठे व विश्वनाथ पाचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन डोखळे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सेवा पदक, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख, उपमुख्याध्यापिका हेमलता जाधव, बी. एस. राठोड, पर्यवेक्षिका सुनीता रसाळ, सुनीता जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
