दर्पणकार पत्रकार संघ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांचे संयुक्त आयोजन, प्रवीण नागरे यांचा पुढाकार

नाशिक मिरर वृत्तसेवा :

 दर्पणकार पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवनगौरव पुरस्कार–२०२५ वितरण सोहळा पिंपळगाव बहुला येथील वृंदावन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सातपूर विभागीय अध्यक्ष इंजि. प्रवीण नागरे यांच्या पुढाकारातून आणि दर्पणकार पत्रकार संघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ नागरिक, वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकार बांधवांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा अधिकच देखणा ठरला.

 

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार,दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव एरंडे, सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे, ज्येष्ठ नेते रामनाथ शिंदे आणि धनंजय राहणे हे मान्यवरउपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दर्पणकार पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चव्हाणके यांनी भूषवले.

oplus_131072

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव एरंडे यांनी केले. प्रवीण नागरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पत्रकार शशिकांत निमर्क यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अशोक चव्हाणके यांनी पत्रकार आणि समाजकार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित केले, तर मार्गदर्शनपर भाषणात गजानन शेलार यांनी संघटनेच्या एकात्मतेचे आणि समाजातील सकारात्मक कार्याचे महत्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्पणकार पत्रकार संघाचे पदाधिकारी सागर आनप (सहसचिव), ज्ञानेश्वर आंधळे (उपाध्यक्ष), जगन्नाथ काळे (खजिनदार), प्रदीप कापसे, अनिल शिंदे, कानिफ गडाख, सुदाम ढगे, मधुसूदन आव्हाड, नितीन डेगळे यांनी पुढाकार घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अभिमन्यू गुडघे पाटील सातपूर युवक अध्यक्ष), सचिन उशीर, पंकज नागरे, निलेश बोडके, मनीष नागरे, अमोल पाटील, राहुल पाटील, अजिंक्य घुगे, रोहित नागरे आणि कृष्णा नागरे यांनी परिश्रम घेतले. उत्साही आणि सन्मानपूर्ण वातावरणात पार पडलेला जीवनगौरव पुरस्कार–२०२५ सोहळा उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

……

बातम्या

Don`t copy text!