नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी सहज मिळावेत, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांच्या पुढाकारातून भव्य शासकीय योजना लाभवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, संपर्क नेते विलास शिंदे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले, ग्रामीण जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, माजी नगरसेविका सीमा निगळ, पल्लवी पाटील, अरुण घुगे, धीरज शेळके, कैलास जाधव, भिवानंद काळे, आकाश पवार, कल्पेश कांडेकर, सोनाली सोनार तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे खताळे, नवल घरटे, प्रल्हाद झांबरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले. लेक लाडकी योजनेअंतर्गत 400 लाभार्थ्यांना कार्ड वितरण करण्यात आले, दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजेनुसार विशेष आर्थिक सहाय्याचे चेक देण्यात आले, तर बाल संगोपन योजनेअंतर्गत 275 मुलांना आवश्यक लाभ मिळाले. ज्येष्ठ नागरिकांना वय वंदन कार्ड चेही वितरण करण्यात आले. सातपूर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात या उद्देशाने संपूर्ण नियोजन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे व रोहिणी देवरे यांनी केले. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

