आईचा हात फ्रॅक्चर, 1 लाख रुपये हिसकावले – वणी पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक मिरर वृत्तसेवा :
दिंडोरी तालुक्यातील कोशीबे गावात सरपंचांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुंडगिरीने गाव हादरले आहे. सायबर कॅफे चालक समाधान भास्कर खरे (वय 25) यांना घरासमोर आठवडी बाजारातील गोंधळावरून झालेल्या किरकोळ वादातून जीवघेणी अशी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात खरे यांची आई फुलाबाई यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, कुटुंबातील तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय हल्लेखोरांनी घर व सायबर कॅफेमधून एक लाख रुपये जबरदस्ती हिसकावून नेल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता, समाधान खरे आपल्या ‘मृत्यूंजय जन सेवा केंद्र’ (सायबर कॅफे) मध्ये काम करत असताना घरासमोरील आठवडी बाजारासाठी विक्रेते ताडपत्री टाकून बसण्याची तयारी करत होते. समाधान खरे यांनी विक्रेत्यांपैकी विजय जाधव याला —
“रस्ता अडवू नका, थोडं बाजूला बसा”
असं सांगितलं. यावरून विजय जाधव संतापला आणि त्याने शिवीगाळ करत सरपंच विलास वटाणे, युवराज वटाणे, पंडीत वाघेरे यांना बोलावून आणलं.
सरपंचाचा थरकाप उडवणारा हल्ला :
तक्रारीनुसार, गावचे सरपंच विलास वटाणे यांच्यासह 10-12 जणांनी समाधान खरे यांच्यावर अचानक झडप घालत—
गच्ची धरून लाथा-बुक्यांनी मारहाण
जमिनीवर पाडून विटांनी डोक्यात व पाठीवर प्रहार
कविताबाई वटाणे यांचा संवेदनशील जागी लाथेबुक्यांचा हल्ला
“सरकारी योजना सोशल मीडियावर टाकू नकोस” अशी धमकी

आई-भावालाही मारहाण; आईचा हात तुटला :
समाधानचे भाऊ सतीश व आई फुलाबाई खरे सोडविण्यासाठी धावत आले असता,
विलास वटाणे, कविता वटाणे, निलेश वटाणे, विक्रम वटाणे, युवराज वटाणे, राजुबाई वटाणे, आशा वटाणे, हरीश वटाणे, योगिता वटाणे सर्वांनी त्यांच्यावरही हल्ला केला.
या दरम्यान गणेश वटाणे लोखंडी रॉडने मारायला जात असताना, आई फुलाबाई यांनी मुलाला वाचवण्यासाठी हात पुढे केला आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला.
स्कार्पिओत बसवून जबरदस्ती पोलिस ठाण्यात नेले :
हल्लेखोरांनी समाधान खरे यांना जोरजबरीने
स्कार्पिओ (एमएच 15 KC 8888) मध्ये बसवून
मारहाण करत वणी पोलिस ठाण्यात नेले, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
1 लाख रुपये लंपास; तिघे गंभीर जखमी :
हल्ल्यादरम्यान खरे कुटुंबाच्या घरातून व सायबर कॅफेमधून
एक लाख रुपये बळजबरीने उचलून नेल्याचाही तक्रारदारांचा दावा आहे.
नाकातून रक्तस्त्राव झाल्याने समाधान खरे बेशुद्ध पडले, तर आई फुलाबाई व भाऊ सतीशलाही गंभीर दुखापती झाल्या. वणी ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी तिघांना नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान दाखल करण्यात आले.
वणी पोलिसांत गुन्हा दाखल
मारहाणीचा संपूर्ण प्रकार समाधानचे भाऊ सतीश खरे यांनी पोलिसांना सांगितला असून,
सरपंच विलास वटाणे आणि त्यांच्या परिवारातील अनेक जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु पोलीस आरोपी वर कारवाई करत नसल्याने संपूर्ण गावं दहशती खाली आहे. आरोपी वर कायद्याच्या बालेकिल्लात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
