नाशिक मिरर वृत्तसेवा:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातपूर विभाग संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन गुरुवारी (दि. 20) अमृत चौक, सुला सर्कल, त्रंबक रोड येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या कार्यालयाचे उद्घाटन मा. आमदार सुनील भुसारा (नाशिक जिल्हा प्रभारी) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गजानन शेलार (शहर जिल्हाध्यक्ष) यांच्या शुभहस्ते फीत कापून कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

 

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडले, ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे, शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश धात्रक, महिला शहराध्यक्ष अनिता दामले, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नलिनीताई शिंदे, सुरगाणा तालुकाध्यक्ष रणजीत गावित उपस्थित होते. तसेच विजय मटाले, विक्रांत डहाळे, श्रीकृष्ण काळे, वर्षा पवार, दत्ताजी वामन, धनंजय राहणे, अभिमन्यू गुडघे पाटील, रूपाली काटे, विश्वनाथ निकम, राहुल पाटील, सचिन उशीर, नारायण गायकवाड, गणेश भावले, दीपक भावले, अमोल भावले, राज धात्रक, मयूर लोखंडे, रवी पवार, हर्षद गांगुर्डे, आशुतोष तेलोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस सातपूर विभागातील सर्व पदाधिकारी, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक राजेंद्र नागरे, अरुण नागरे, पुरुषोत्तम नागरे, रघुनाथ नागरे, त्रंबक नागरे, भाऊसाहेब भावले यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला ऊर्जित प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सातपूर विभाग अध्यक्ष इंजी. प्रवीण नागरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक विष्णुपंत नागरे, पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती विनायक नागरे तसेच पै. पंकज नागरे यांनी केले.

 

या संपर्क कार्यालयाच्या स्थापनेमुळे सातपूर परिसरातील पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असून नागरिकांशी थेट संवाद साधणे अधिक सुलभ होईल तसेच स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असे मनोगत इंजी. प्रवीण नागरे यांनी व्यक्त केले.

बातम्या

Don`t copy text!