नाशिक मिरर वृत्तसेवा : सागर आनप

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक 2025 चा निकाल स्पष्ट झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी राजकीय बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकूण 11 नगरपरिषदांपैकी शिंदे गटाच्या शिवसेनेने तब्बल 5 नगराध्यक्षपदे जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

तर भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीला (काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी) एकाही नगरपरिषदेत यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एमव्हीएसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

एकूण निकाल आकडेवारी (Nashik Nagar Parishad Result 2025)

🏛️ एकूण नगराध्यक्षपदे: 11

🟠 शिवसेना (शिंदे गट): 5

🟡 भाजप: 3

🟢 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 3

🔴 महाविकास आघाडी: 0

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदनिहाय विजयी उमेदवार

भगूर: प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी (अजित पवार गट)

येवला: राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी (अजित पवार गट)

सिन्नर: विठ्ठलराजे उगले – राष्ट्रवादी (अजित पवार गट)

नांदगाव: सागर हिरे – शिवसेना (शिंदे गट)

इगतपुरी: शालिनी खातळे – शिवसेना (शिंदे गट)

सटाणा: हर्षदा पाटील – शिवसेना (शिंदे गट)

त्र्यंबकेश्वर: त्रिवेणी तुंगार – शिवसेना (शिंदे गट)

मनमाड: योगेश पाटील – शिवसेना (शिंदे गट)

चांदवड: वैभव बागुल – भाजप

पिंपळगाव बसवंत: डॉ. मनोज बर्डे – भाजप

ओझर: अनिता घेगडमल – भाजप

या निकालातून शिंदे गटाची शिवसेना नाशिक जिल्ह्यात भक्कम पाय रोवताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाचा प्रभाव स्पष्ट झाला आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीची कामगिरी शून्यावर आल्याने पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

बातम्या

Don`t copy text!