दिंडोरी : नाशिक मिरर वृत्तसेवा – दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत असलेल्या कणेरी नाल्यालगत असलेल्या अरुण मुरलीधर तिडके यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात गेल्या तीन दिवसात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून या बिबट्यांची माता असलेली मादी बिबट्या अजूनही परिसरात फिरत असल्याने वनविभागातर्फे या मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली
