धुळे : नाशिक मिरर वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावरुन कत्तलीसाठी जाणा-या तीन गाडयांमधुन 42 गुरांची मुक्तता करण्यात पोलिस पथकांना यश आले आहे. शिरपुरसह सोनगीर व थाळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 16 लाख 69 हजार रुपये किमतीचे गुरांना जिवदान देण्यात आले असुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशातुन मोठया प्रमाणावर गुरांची बेकायदेशीरपणे वाहतुक सुरु असल्याची माहीती पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारींना गस्त वाढवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बातम्या

Don`t copy text!