नाशिक मिरर : 
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील सर्व जेष्ठ नागरिक तसेच महिला यांची प्रभागांमध्ये असलेल्या मनपा च्या मोकळ्या मैदानावरील मंदिर, उद्याने, आदी ठिकाणी योग्य बसण्याची सोय व्हावी, यासाठी बाकडे बसविण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
    सदर मागणीवरून प्रभागाच्या जेष्ठ नगरसेविका इंदुबाई सुदाम नागरे यांच्या १० लाख रुपयांच्या  नगरसेवक निधीतून  ९० बाकडे बसविण्यात आले आहे.
      यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक १० मध्ये बाकडे बसवण्यात आले आहे. यावेळी रवींद्र पालवे, चेतन श्रीराम, सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले. बाकडे बसविल्यानंतर प्रभागातील उपस्थित नागरिक तानाजी पवार, शाम मराठे, रमेश जाधव, कैलास गांगुर्डे, प्रभागातील महिला व जेष्ठ नागरिक यांनी समाधान व्यक्त केले.
 बाकडे बसवलेली ठिकाणे :                                                                                               
  पवनपुत्र हनुमान मंदिर विश्वास नगर, श्रीकृष्ण मंदिर पवार संकुल, सप्तशृंगी मंदिर पवार संकुल, महादेव मंदिर विश्वास नगर, स्वामी समर्थ केंद्र विश्वास नगर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर अष्टविनायक कॉलनी, इच्छामणी गणपती मंदीर संभाजीनगर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर संभाजीनगर, सप्तशृंगी मंदिर संभाजीनगर, विठ्ठल रुक्माई मंदिर, रेणुका माता मंदिर,डी.एस. पार्क मैदान, खंडेराव मंदिर, जाईचा मारुती मंदिर, राधाकृष्ण मंदिर, नागरे, चौक सातमाऊली मंदिर, तुळजाभवानी मंदिर वास्तूनगर, सिद्ध हनुमान मंदिर अशोक नगर, भाजी मार्केट स्पेस अशोक नगर, गणपती मंदिर वास्तू नगर, अभ्यासिका अशोक नगर, सिद्धिविनायक गणपती मंदिर राज्य कर्मचारी, सप्तशृंगी देवी मंदिर जाधव संकुल, शनी मंदिर जाधव संकुल, दत्तमंदिर, निलकंठेश्वर  नगर अभ्यासिका, हनुमान मंदिर सावरकर नगर, हनुमान मंदिर अशोक नगर, राजवाडा पिंपळगाव, कोळीवाडा पिंपळगाव, हनुमान मंदिर पिंपळगाव, महादेव मंदिर पिंपळगाव ई.

बातम्या

Don`t copy text!