निष्क्रिय अधिकारी ची बदली करण्याची मनपा आयुक्ता कडे रा. यु. कॉ ची मागणी
नागरिकांचे तक्रारीचे फोन उचलावेत म्हणून चक्क अधिकाऱ्यांना नवीन मोबाईल भेट
नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक युवक शहरअध्यक्ष नितीन निगळ व पदाधिकारी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालया मधील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निष्क्रिय अधिकाऱ्याची पाटी लावून आंदोलन करून निषेध व्यक्त करत अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी नाशिक मनपा आयुक्ताकडे केली आहे.
नाशिक महापालिका सातपूर विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी डी. एस. कोल्हे हे निष्क्रिय अधिकारी म्हणून महापालिकेचा कारभार करीत आहेत,असा आरोप नितीन निगळ यांनी केला आहे.
सातपूर विभागातील बांधकाम विभागाशी संबंधित कोणतेही कामे असल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हे कोल्हे यांना भेटून हे काम करण्यासाठी विनवणी करतात. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून सदर अधिकारी हे नागरिकासह इतर पदाधिकारी यांचे फोन उचलत नाहीत. कार्यालयात काम संदर्भात भेटण्यास गेले असता खर्ची नेहमी रिकामी असते.सातपूर विभागात बांधकाम विभागाशी संबंधित बरेच कामे होत नाहीत.जे कामे सुरु आहेत ते निकृष्ट दर्जाचे सुरु आहेत. नितीन निगळ शिवजन्मोत्सव समिती चे माजी अध्यक्ष आहे. शिवजन्मउत्सव एक महिन्या वर आला आहे.कार्यक्रमाच्या तयारी बाबत सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी कोल्हे यांना वारंवार फोन करीत होते. मात्र त्यांनी काम तर केलेच नाही. व फोन सुधा उचलला नाही. त्यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी अधिकारी कोल्हे यांच्या खुर्चीला निष्क्रिय अधिकारी म्हणून पाटी लावली व त्यांनी फोन सर्वसामान्य नागरिकांचा तक्रार बाबत चा फोन उचलवा यासाठी त्यांना नवा कोरा मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन निगळ,अभिमन्यू पाटील,रवींद्र पवार, अनिकेत निगळ आदी उपस्थित होते.

– नितीन निगळ, रा. यु. कॉ अध्यक्ष नाशिक
