जिल्हात १ हजार ९४१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर :जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात आज एकूण २७१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून, यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १९३ रुग्ण आहेत.नाशिक शहरात कोरोना रुग्ण संख्येत रोज सरासरी २०० रुग्ण आढळून येत आहे.त्यामुळे नाशिककरांनी स्वतः ची कुटुंबाची काळजी घेणे अधिक आवश्यक झाले असून, सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक झाले आहे.मास्क आणि सॅनिटायझर वापर पुन्हा आवश्यक झाला असून, गरज असेल तर घरा बाहेर पडण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. आज पर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख १६ हजार १५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ९४१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५५, चांदवड १५, सिन्नर ६१, दिंडोरी ४१, निफाड ८५, देवळा १८, नांदगांव ५४, येवला १५, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण १७, बागलाण २९, इगतपुरी १६, मालेगांव ग्रामीण ३६ असे एकूण ४६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २६९,

मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९७ तर जिल्ह्याबाहेरील १२ असे एकूण १ हजार ९४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २० हजार १८२ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.३४ टक्के, नाशिक शहरात ९७.०८ टक्के, मालेगाव मध्ये ९२.३९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ इतके आहे.

एकूण मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८२४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्हा बाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ९० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️१ लाख २० हजार १८२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १६ हजार १५१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ९४१ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के.

दिनांक: 23 फेब्रुवारी 2021
रोजीचे कोरोना अपडेट

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-229

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 271

नाशिक मनपा- 193
नाशिक ग्रामीण- 57
मालेगाव मनपा- 10
जिल्हा बाह्य- 11

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2090

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -00
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00

Don`t copy text!