नाशिक मिरर : प्रतिनिधी

पंचवटी कारंजा येथे संभाजी ब्रिगेड व स्वराज्यरक्षक संघटना आयोजीत `शिवदीपोत्सव २०२१’  उत्साहात साजरा झाला. यावेळी शिवचरित्रकार सोपान वाटपाडे यांनी `जनकल्याण राजाʼ या पुस्तकाची पहिली प्रत छत्रपतींचरणी अर्पण केली. दीपप्रज्वलन करुन व विनाआवाजाचे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

यावेळी स्वराज्यरक्षकचे सल्लागार योगेश कापसे, पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रवींद्र दातीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पेलमहाले, भावनेश राऊत, अक्षय भोसले, शाहू पवार, श्याम जाधव, पूनम पाटील, अंजली अभंगराव, ऋषीकेश ढवळे, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख हार्दिक निगळ, प्रसाद गोसावी, सिद्धांत तिसगे, साहील गांगुर्डे, ईशान बागुल, यश पाटील, गौरव चव्हाण, कृष्णा मुसळे, आदित्य सांगळे, कृष्णा पटेल आदींनी केले.

बातम्या

Don`t copy text!