तीन टप्यात वीज बिल भरण्याची सवलत
नाशिक मिरर :
     कोरोना लॉकडाऊन काळात  आलेल्या वाढीव वीज बिल भरण्यासाठी नागरिकांना  दोन ते तीन टप्यात वीज बिल भरण्याची सवलत देण्यात यावी ,ग्राहकांचे वीज बिल कनेक्शन कट करू नये. या मागण्याचे निवेदन वीज वितरण अधिकारी यांना देण्यात आले.  जागतिक कोरोना  महामारी मुळे आर्थिक संकटात सापडल्या मुळे आलेले अवास्तव वीज बिल नागरिक  भरू न शकल्यामुळे  वितरण कर्मचारी  नागरिकांचे कनेक्शन कट करत होते,या बाबत विज वितरण कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडून वीजबिल  न  भरणाऱ्या लोकांचे वीज कनेक्शन तोडू नये, व दोन ते तीन टप्यात वीज बिल भरू देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले ,  या वेळी राष्ट्रवादीचे सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते, युवक अध्यक्ष निलेश भंदुरे, नाशिक चिटणीस अनिस शेख, कार्यध्यक्ष समाधान तिवडे,सामाजिक न्याय अध्यक्ष सिद्धांत काळे, मुन्ना तुपे, प्रभाग अध्यक्ष, सचिन उशीर, प्रदीप मुंढे, दत्तू वामन,संघटक अरुण पानपाटील, युवक कार्यध्यक्ष, तुषार दिवे, विद्यार्थी अध्यक्ष संतोष बल्लाळ, प्रशांत गांगुर्डे, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!