नाशिक मिरर :सातपूर प्रतिनिधी
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला मोठा धार्मिक वारसा आहे.रावणाने सीता मातेला हवाईमार्गे पळून नेत्यांना रावणाशी युद्ध केले होते.यावेळी जटायू चे रावणाने पंख छाटले होते. त्यामुळे जटायू च्या स्मरणार्थ येथील ओझर विमानतळाला जटायू विमानतळ नाव देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू सेनेच्या वतीने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी विश्व हिंदू सेनेचे संस्थापक अँड. महेंद्र शिंदे,दीपक आरोटे,सतीश घैसास,विशाल साळवे,सिद्धार्थ खोचे, मयूर मोरे शिवम तिवारी प्रितेश भदाणे धीरज खोळंबे,आनंद पाटील आदीसह विश्व हिंदू सेनेचे पदधिकारी उपस्थित होते.
