नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

जेसीआय पंचवटी होलीसिटीतर्फे `अनुरूप बंधन २०२१’ अंतर्गत बँक ऑफ बडोदासोबत हिंदी भाषा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे सुनंदा कुलकर्णी यांनी हिंदी भाषा दिवसाविषयी माहिती दिली. तसेच सर्वांना आग्रह केला की, हिंदी भाषेतील साहित्य व वृत्तपत्र जरूर वाचावे. बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक प्रवीण लाडे यांनी हिंदी भाषा ही बँकेच्या कामकाजात किती महत्वपूर्ण आहे, हे सांगितले.

माजी अध्यक्ष  प्रणव यांनी जेसीआयबाबत माहिती दिली. याप्रसंगी जेसीआय सप्ताहाच्या अध्यक्षा तेजश्री धाकराव, सचिव अमृता कर्नाटकर, विनोद करवा, गौरव धाकराव आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!