नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
मखमलाबाद परिसरातील नागरिकांसाठी अमृतवन योग परिवार, हास्यक्लब व जागृती ज्ञानदीप मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर झाले. यावेळी नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

आवश्यकतेनुसार मोफत तपासणी :

शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांची आवश्यकतेनुसार पुढील तपासणी, तसेच हृदय व इतर शस्त्रक्रिया एसएमबीटी रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे. शिबिरातील नेत्र तपासणी केलेल्या नागरिकांना सवलतीत चष्मेही वाटप करण्यात आले.

                याप्रसंगी हास्य योग प्रशिक्षक सोमवंशी, मंडल अधिकारी भगवान काकड, सुधाकर राख, श्रीकांत डुबेरकर आदींनी शिबिरास भेट दिली. आयोजक ज्ञानेश्वर काकड यांनी स्वागत केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी बबन ढगे, शिवाजी मानभाव,अंबादास शेलार, तुषार गांगुर्डे, जयश्री गावित, पुष्पा जाधव, सुषमा ढगे, सुनीता काकड, गोकुळ पवार, विजय थेटे, पंढरीनाथ कुंभार, दिलीप पताडे,,चंद्रभान अहिरे, सुदर्शन काकड, धीरज मगर, विलास तिडके, प्रथमेश काकड आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!