नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
नाशिकमधील तिडके नगर येथील कल्याणी जगदीश मोहुर्ले यांनी विसर्जनाचे औचित्य साधून अष्टविनायक यांची प्रतिमा असलेली रांगोळी काढली. गणपती बाप्पांना निरोप दिला जात असताना, ही रांगोळी लक्षवेधी ठरली. कल्याणी मोहुर्ले यांचा रांगोळीतून चित्रे साकारण्यात हातखंडा आहे.
