नाशिक मिरर :
नाशिक मनपा शिक्षक विभागातील एक शिक्षक यांना
म्युकरमायकोसिस या दृधर आजराने ग्रासले.कोरोना तुन उपचार घेऊन नुकतेच बरे झालेल्या शिक्षक यांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च येणार होतो. त्यामुळे नाशिक मनपा विभागातील तब्बल ५६३ शिक्षक यांनी एकत्र येत ६ लाख रुपयांचा निधी एका दिवसात जमा करून माणसुकीचे सुंदर दर्शन घडवले आहे.
मनपा शिक्षक यांना गेल्या वर्षभरापासून निवारा शेड ड्युटी, माझे कुटुंब माझी जबाबदारी , शाळाबाहय मुले सर्वेक्षण, पॉझिटिव्ह कोरोना पेशंट काँट्रॅक्ट ट्रेसिंग सर्वे , अँटीजन टेस्ट, लसीकरण केंद्र येथे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. सेवा बजावत असताना आतापर्यंत १५० शिक्षक पॉझिटिव्ह झाले. त्यात तीन शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षक हिरामण चव्हाण हे तीन दिवसांपूर्वीच कोरोना आजारातून अंत्यत कठीण परिस्थितीतुन बाहेर आले पण दोन दिवस होत नाही तोच त्यांना नवीन म्युकरमायकोसिस हा आजाराने आपल्या कुवेत घेरले. चव्हाण यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने व या आजारासाठी येणारा खर्च मोठा होतो.
नाशिक मनपा शिक्षण विभागातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षक यांचे वतीने ‘एक हात मदतीचा, या नावाने मदतनिधीसाठी मनपा शिक्षक विभागातील सर्व शिक्षक यांना आव्हान करण्यात आले. त्यासाठी हिरामण चव्हाण सर यांचा खाते क्रमांक 33410580831
IFSCOD SBIN001076 फोन पे मोबाइल नंबर 8208233220 सर्व शिक्षकांच्या व्हॉटसप ग्रुपवर टाकून आपल्याला शक्य ती आर्थिक मदतीसाठी अहवान करण्यात आले होते. या अहवानाला उदंड प्रतिसाद देत माणुसकी नात्याने दिवसभरात मनपा अधिकारी,मनपा शिक्षक , मुख्याद्यापक, खाजगी शाळेतील मुख्याद्यापक, शिक्षक इतर क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार , यांच्या मदतीने स्वेच्छेने रुपये ५०० ते ५ हजार रुपये अशी ५६३ मदतीचे हात पुढे सरसावले व आर्थिक मदत देत ६ लाख रुपये खात्यात जमा झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे. मदतनिधी जमा केला गेला यासर्व शिक्षक,शिक्षिका व अधिकारी वास सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी माणुसकीचे दर्शन घडवून आदर्श निर्माण केला आहे.
