नाशिक मिरर : अशोकनगर येथे रस्त्यांने पायी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी सातपूरच्या प्रवासी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकनगरच्या महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेट समोर फिर्यादी महिला व त्यांची मामे बहीण या सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास सेल दुकानाकडून स्टेट बँकेकडील रस्त्यांने पायी जात असतांना प्रवासी रिक्षा क्र.एम एच १५ एफ क्यु. २८५४ याचा चालकाने अचानकपणे रिक्षा थांबवुन फिर्यादी महिलेच्या मामेबहिनीचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.दरम्यान फिर्यादी महिलेने त्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर फिर्यादी महिलेस देखील त्याने धक्काबुक्की करुन लज्जा उत्पन्न होईल असे लज्जास्पद कृत्य केले.व मामेबहिनीच्या गालावर चापट मारली.या कारणाने रिक्षा चालक अक्षय गिरीश जोशी रा.महादेव मंदिराजवळ,श्रमिकनगर या संशयित आरोपीला अटक करुन दोघा महिलांचा विनयभंग केल्या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुकदेव काळे करीत आहे.
