नाशिक मिरर वेबटीम :   सातपूर मधील साई रुद्रा बहुउद्देशीय संस्था च्या वतीने बालकांना अन्नदान देऊन  छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात आली. स्वराज्यातील जनता उपाशी राहिला नको असे धोरण शिवाजी महाराजांचे होते. त्यांचा आदर्श जोपासत संस्थे चे संस्थापक अध्यक्ष शाम फर्नांडिस यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मधील खांबाळे येथील श्रीमती गारडा बालसदन अनाथ आश्रम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून , तेथील बालकांना अन्नदान देऊन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगून शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी सुनील गुंजाळ, सुभाष भागवत, न्यानेशवर नहिरे, माजी सैनिक रायते सर, पंकज खरात, आशिष राजपूत आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!