नाशिक मिरर वेबटीम : मुंबई, पुणे पाठोपाठ वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्री पासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत ही संचारबंदी लागु असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय गोरज मुहूर्तावरील लग्नाला परवानगी देण्यात येणार नसून 50 लोकांमध्ये लग्न आटोपते घ्यावे , असं आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. दरम्यान, लग्न समारंभ, गर्दीचे ठिकाण, भाजी मंडई, दुकाने येथे जाऊन मनपा अधिकारी व पोलीस प्रशासनाने तपासणी करावी. याठिकाणी विना मास्क असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी आशा सूचना भुजबळ यांनी नाशिक मनपा आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत.
