सातपूर कॉलनी ते रायगड कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी मोर्चा

नाशिक मिरर वेबटीम : राज्यातील सर्वसामान्य जनता वाढीव विजबिलांमुळे त्रस्त असतांना राज्य शासनाचे ह्या विषयाच्या गांभीर्याकडे लक्ष नसून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संस्थापकीयअध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशाने.मनसे गटनेते सलिम शेख,मा.प्रभाग सभापती सातपूर तथा नगरसेवक योगेश शेवरे ,दिलीप दातीर या पदाधिकाऱ्यांतर्फे पायी सातपूर ते राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रचंड मोर्च्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जागतिक कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वर बंद पडून अनेकांचे संसार मोडकळीस आले आहे. याही परिस्थितीत गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळातर्फे एप्रिल २०२० मध्ये अन्यायकारक छुपी विज दरवाढ करण्यात आली असून लॉकडाऊनच्या काळात मोठ्या रकमेची सरासरी वीज देयके देऊन जुलम करण्यात आल्याची भावना राज्यातील गोरगरीब जनतेत बळावत आहे. सरकारच्या मालकीच्याच महामंडळाच्या ह्या मोगलाई कारभारावर राज्यातील जनतेत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. हे सरकारी महामंडळ आहे, का खाजगी सावकार असा प्रश्न गरीब जनतेला पडला आहे. त्यातही आधी वाढीव वीजबिल द्यायचे आणि ज्यांना हे भरमसाठ वीजबिल भरणे जमत नाही .त्यांना संपूर्ण बिल न भरता अंशतः बिल भरायची सूट देण्याचा प्रकार असा अजब कारभार महामंडळाने चालवला आहे. आधीच राज्यातील विजभार हा इतर राज्यांपैक्षा आधीच अधिक असतांना भरमसाठ वाढ केली आहे. सर्व सामान्य जनतेच्या कल्याणाकरीता चालविलेल्या सरकारनेच जर अशी लुट चालवली तर जनतेने कुणाकडे बघायचे ? आज राज्यातील गोरगरीब जनता लहान-मोठ्या समस्यांच्या समाधानासाठी राज ठाकरे यांच्याकडे आशेने बघत आहे. समस्या कुठल्याही असो उत्तर फक्त राज ठाकरे आहे, अशी प्रचीती आज जनतेला येत आहे. वीजबिल कमी होणे बाबत सरकारचे मंत्री,राज्यपाल,आघाडी नेते दाद देत नसल्याने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव वीजबिल संदर्भात वीज ग्राहकांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडून मोठ्या रकमेची सरासरी वीज देयके, अन्यायकारक विज दरवाढ तसेच थकीत विजदेयकांवरीलवरील व्याज तात्काळ रद्द करून वीज वापरानुसार वीजबिले देऊन गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा असे निवेदन देण्यात आले आहे.
या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख व योगेश शेवरे, नगरसेविका नंदिनी बोडके, वैशाली भोसले, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, सुरेश घुगे, मनोज ढिकले, संतोष सहाणे, रमेश खांडबहाले, संदीप किर्वे, संतोष पिल्ले, नितीन साळवे, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास तात्या दातीर, प्रकाश दादा निगळ, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, सचिन भोसले, अविनाश पाटील, सुनील गायधनी, शैलेश शेलार, सतीश विसपुते, प्रकाश शिंदे, प्रकाश गोसावी, नवनाथ कोठुळे, अॅड. दिलीप केदारे, राजेश तापकिरे, संतोष कोरडे, पराग शिंत्रे, किशोर जाचक, प्रकाश बंटी कोरडे, नितीन माळी, निखील सरपोतदार, अमित गांगुर्डे, संजय देवरे, जावेद शेख, डॉ.किरण कांबळे, नवनाथ जाधव, अमोल चांदवडकर, अर्जुन वेताळ, गोपी पगार, कामिनीताई दोंदे, पद्मिनीताई वारे, स्वाती मगर, अरुणाताई पाटील, अनिता ठोक, निर्मलाताई पवार, कांचन पाटील, मुक्ताताई इंगळे, अॅड. भाग्यश्री ओझा, वृंदा आहेर, खंडेराव मेढे, संदीप भवर, शशी चौधरी, गणेश मंडलिक, कौशल पाटील, शाम गोहाड, अरुण दातीर, संदेश जगताप, ललित वाघ, सौरभ सोनवणे, रोहन जगताप, अजिंक्य बोडके, स्वप्नील वाघचौरे, विक्की बिऱ्हाडे, सोनू नागरे, अक्षय कोंबडे, सिद्धेश सानप, अमोल भालेराव, राम बिडवे, आदि पदाधिकारी तसेच महिला सेना, विध्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!