भारतीय  संविधान दिन ठरला आंदोलनाचा

१.औद्योगिक भवन मधील सरकारी निमसरकारी कर्मचारी

२.महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना

३.महाराष्ट्र घरेलू कामगार संघटना

४.सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था

नाशिक मिरर वेबटीम : संविधान दिनाच्या दिवशी गुरुवारी आपल्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्ष, संघटनांसह सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा व आंदोलन पुकारत सरकारचे लक्ष वेधल्याने गुरुवारचा संविधान दिन हा आंदोलनाचा दिवस ठरला.

कामगार कार्यालय कर्मचारी संघटना गुरुवारी (दि. 26) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कामगार कार्यालय कर्मचारी संघटनेने संपात उडी घेत सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जुनी पारिभाषिक पेन्शन योजना लागू करा, सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष करा, खाजगी करणला आळा घालून कंत्राटीकरण रद्द करून अंश कालीन बदली व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा या आणि अश्या विविध मागण्याचे निवेदन कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य दुकान निरीक्षक संघटना प्रमुख कार्यवाह विशाल जोगी, दुकान निरीक्षक निशा आढाव, सुधीर देवरे, ललित दाभाडे, विलास झांबरे, लिपिक पी पी जाधव, शिपाई विनायक जोशी, मिलिंद कांबळे आदींसह कामगार उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

     महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना

सातपूर : गुरुवारी (दि 26) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेने सहभाग नोंदवत संपात उडी घेतली. सिटूचे जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, शिंधू शार्दूल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी कोरोना काळात मंजूर करण्यात आलेले अर्थ साहाय्य लाभ त्वरित अदा करणे, बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत व सोपी करत नोंदणी व नूतनीकरण मंडळामार्फत करा, कामगारांना मेडिक्लेम योजना लागू करा यासह बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याचे निवेदन कामगार उपयुक्त गुलाब दाभाडे यांना देण्यात आले. यावेळी संतोष गांगुर्डे, नितीन सुर्यवंशी, मोहन जाधव,भागवत डुंबरे,विजया टिक्कल, विशाल महाले, खंडेराव झाडे, सतीश खैरनार, मोहन जाधव, संतोष गांगुर्डे, अशोक भालेराव,सिंधू शार्दूल, आदींसह बांधकाम कामगार उपस्थित होते.

महाराष्ट्र घरेलू कामगार संघटना

सातपूर : सिटू संलग्न महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेने गुरुवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभाग नोंदवला. सिटूचे जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, शिंधू शार्दूल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या महिला घर कामगारास पेन्शन योजना लागू करा, घर कामगारास दिवाळी बोनस लागू करा, नैसर्गिक मृत्यूचा लाभ त्वरित लागू करा, रेशन व्यवस्था सुरळीत करत कामगारास पिवळे रेशन कार्ड अदा करा यासह घरेलू कामगारांच्या विविध मागण्याचे निवेदन कामगार उपयुक्त गुलाब दाभाडे यांना देण्यात आले. यावेळी सतीश खैरनार, मोहन जाधव, संतोष गांगुर्डे, अशोक भालेराव,सिंधू शार्दूल, आदींसह घरेलू कामगार उपस्थित होते.

नाशकात वाढीव वीजबिल रद्द होण्यासाठी मनसेचा महामोर्चा https://www.nashikmirror.com/?p=1444

सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था
सातपूर : सातपूर आयटीआय
गुरुवारी (दि 26) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सातपूर येथिल शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआय मधील शिक्षकांनी संपात उडी घेतली. परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी संपात प्रत्यक्ष उडी न घेता काळ्या फिती लावून संपात सहभाग नोंदवला.

बातम्या

Don`t copy text!