नाशिक मिरर वेबटीम  : अशोकनगर येथील वाहतुकीची दिवसरात्र वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर व  पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेले साडीचे दुकान फोडून सुमारे ७५ हजारांच्या साड्यांची चोरी दोंन भामट्या महिलेनी केली आहे.मात्र पोलिसांना दोन भामट्या महिला शोधणे आव्हान ठरले आहे.
       अशोकनगर येथे सुरत टेक्सटाईल नावाचे कल्लू चंदराम चौधरी वय (३०) रा. भाजी मार्केटजवळ यांचे दुकान असुन नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे शटर अर्ढ़वट उघडे दिसले.आत जावून पाहिले काऊण्टरसमोर रचलेल्या भारी व महागड्या  साड्यांची सुमारे ७५ हजार रूपयांची थप्पीच महिला चोरट्यांनी नेली.
      दरम्यान या चोरीबाबत पोलिसांना खबर दिली असता दुकानातील सीसी टिव्ही कैमरात पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी तोंड बांधलेल्या आणि अंधार असल्याने  तोंडात टॉर्चच्या प्रकाशात ब्लू डार्टच्या मोठ्या कैरी बैग मध्ये साड्यां गोळा करतांना दोन  भामट्या महिला आढळून आल्यात. त्या दिशेने पोलिस तपास सुरु असुन लवकरच चोरटे सापडतील पण अशोकनगर पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चोरी झाल्याने  नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
    दरम्यान या दुकाना शेजारी यूनियन बैंक व बँक ऑफ़ इंडियाचे एटीएम देखील आहे. आज पर्यत या मुख्य वर्दळीच्या आणि गजबजलेल्या  रस्त्यांवर कधीही चोरी घरफोडी झाली नसल्याचं या परिसरातील दुकानदारांचे व रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

बातम्या

Don`t copy text!