नाशिक मिरर वेबटीम :  महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीत अंतर्गत युनियनची त्रैवार्षिक निवडणुक १३ फेब्रुवारीला होत आहे. गेल्या सात वर्षांपासुन निवडणुक झाली नसल्याने कामगारांची नाराजी होती. अंतर्गत युनियन असलेल्या महिंद्रा कंपनीत आठ जागेंसाठी तब्बल ७३ उमेदवार रिंगणात आहेत. यात अध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी ८, जनरल सेक्रेटरी पदासाठी ८, सचिव पदासाठी १५, सहसचिव पदासाठी ९, खजिनदार पदाला ७ व अ, ब.सदस्य पदासाठी १९ कामगारांनी अर्ज दाखल केले आहेत. १३ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असुन लगेचच निकाल जाहिर करण्यात येणार असल्याचे माजी युनियन अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.दरम्यान महिंद्रा कंपनीत होत असलेल्या अंतर्गत युनियनच्या निवडणुकीत पहिल्यांचा चुरस वाढली आहे. केवळ आठ जागेंवर ७३ उमेदवार निवडणुक रिंगणात
उभे राहिले आहेत. यात प्रत्येक उमेदवार कामगारांच्या घरी जात वैयक्तिक प्रचार करत असल्याने कुठलाही पँनल तयार करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. माघारीच्या दिवशी केवळ सहसचिव पदासाठी उभे असलेल्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आठ पदासांठी तब्बल ७३ उमेदवार उभे ठाकल्याने महिंद्रा युनियनची निवडणुक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत आजी, माजी पदाधिकारीही कामाला लागले आहेत. सात वर्षांनंतर निवडणुक होत असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. करोना काळात महिंद्रा कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कुठलीही अडचण दिली नाही. युनियन.निवडणुकीत कामगारांनी संयम पाळत मतदान करावे असे मत निवृत्त कामगारांनी व्यक्त केले.महिंद्र अँड महिंद्र कामगार सघंटना शनीवार सकाळी ७ ते ५ वाजे पर्यत कंपनीतील कँन्टीन  मध्ये मतदान होणार आहे .अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सरचिटणीस ,चिटणीस सहचिटणीस ,खजिनदार ,कमीटी मेंबर अ व ब पदासाठी निवडणूक होत आहे .आठ जागासाठी एकूण २ हजार ३०० मतदार मतदान करणार आहे. अध्यक्ष पदासाठी विदयमान अध्यक्ष योगेश चव्हाण सह, माजी उपाध्यक्ष एन डी जाधव ,राजेंद्र पवार ,माजी सेक्रेटरी सुनील गोडसे ,हेंमत नेहते , नरेंद्र पाटील संतोष रिपोटे सात जण रिंगाणात आहेत.उपाध्यक्ष पदासाठी  माजी उपाध्यक्ष संजय घुगे,सजंय बागुल ,संपतराव चुंभळे,एन एन देवरे ,चंद्रकांत पाटील,अशोक रौंदळ ,सुनील ताठे ,चंद्रकांत ठाकरे .सरचिटणीस
पदासाठी पोपटराव देवरे ,सजंय घोडके ,के जे जाधव ,दत्तात्रेय खैरणार ,परशुराम कानकेकर ,फ्रान्सीस लोंढे ,राजेंद्र मोरे असे एकूण ७३ उमेदवार आहेत.

बातम्या

Don`t copy text!