नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्ल्यूसीईसी’ मध्ये
प्रदूषणाच्या संकल्पनेवर उपक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला की, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक अशी छोटी पावले उचलण्यास सुरुवात करू, असे सांगितले. ज्यामुळे आपल्या पर्यावरणात नक्कीच मोठा फरक पडेल.
प्रदूषणाकडे वेधले लक्ष
या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या हानिकारक प्रभावांची जाणीव करून दिली. तसेच वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण यांसारख्या प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या.
कापडी पिशव्या वापरणार
उत्पादनांच्या पुनर्वापरामुळे प्रदूषण कमी करण्याचे उपाय कसे योगदान देतात हे त्यांना प्रभावी पीपीटीद्वारे समजावून सांगितले. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यासारखी उदाहरणेही शिक्षकांनी दिली. ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचरा व्हॅनमध्ये टाकणे, हेही सांगितले.
—
