छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने दीपावली निमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ ; नगरसेविका हेमलता कांडेकर,शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता  गायकर व प्रमोद जाधव यांचे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन

नाशिक मिरर : दिनांक २२ नोव्हेंबर २०२१,सोमवार रोजी सायं सात वाजता श्रमिकनगर मध्ये २२ नोव्हेंबरला खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण तसेच छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने दीपावली निमित्त प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.

युवराज छत्रपती संभाजीराजे हे प्रभाग ९ च्या नगरसेविका सौ.हेमलताताई दिनकर कांडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असून त्यानंतर महादेव मंदिर श्रमीकनगर येथे उर्वरित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये ज्या समाज बांधवांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा दिली अशा काही समाज बांधवाना राजेंच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये साप्ताहिकाचे संपादक रवींद्र एरंडे , कुसुम महाले आरोग्य विभाग गंगापूर, पाशा इस्लाम शेख, जनसेवा ॲम्बुलन्स नाशिक, डॉ. फराज मोतीवाला, रोहिणी रविंद्र जोशी, कोविड समन्वयक,मनपा, सातपूर, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोडके यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दीपावलीनिमित्त विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांचे देखील युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शिवसेना गटनेते विलास शिंदे,छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सातपूर सभापती योगेश शेवरे, माजी नगरसेवक सदाशिव माळी, सोमेश्वर संस्थानचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे यांसह सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, विष्णुपंत घुगे,निवृत्ती शिंदे,अॅड. देवमन शिंदे,परशुराम शिंदे,कौतिक जाधव,किरण बडे,गुमानराव कुडे,श्रद्धा जोशी,हिरामण ढिकले,भागवत घुमरे, लहानु धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका सौ. हेमलता दिनकर कांडेकर,शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता करण गायकर व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव यांनी दिली आहे.

यावेळी उपस्थित परिसरातील नागरिक व समाज बांधवांना युवराज छत्रपती संभाजीराजे मार्गदर्शन पर संबोधित देखील करणार आहे. यावेळी प्राध्यापक राहुल शिंदे निर्मित स्वरसिंदुरा यांच्या वतीने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार असून याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबराव जाधव, बाळा जारे, नवनाथ शिंदे ,सम्राट सिंग, महेश आहेर, एमडी शिंदे, अविनाश गायकर, कमलेश कांडेकर,प्रितेश पाटील,गिरीश आहेर,तुषार पाटील,नितीन पाटील, किरण बोरसे, वैभव दळवी, निलेश शेजुळ, सोनू काळे, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

बातम्या

Don`t copy text!