फॅमिली ग्राहकांची कारवाई करण्याची मागणी
नाशिक मिरर वेेबटिम : सातपूर विभागातील गंगापूर रोड वरील अनेक फॅमिली हॉटेलमध्ये अनधिकृतपणे बिनधास्त पणे ओपन बार चालवले जात असून, मद्य पार्सल घेऊन या आणि नास्ता – जेवण ऑर्डर करा, १०० टेबल चार्ज घेऊन पाहिजे तितकी दारू रिचवा अशी ऑफर मद्यप्रेमी ना देऊन फॅमिली हॉटेल आता बियर बार झाले आहेत. परंतु यामुळे आपल्या परिवार सोबत जेवण करण्यास येणाऱ्या कुटुंबाना हॉटेल मधील या गोष्टी चा मोठा त्रास सहन करावा लागत असून ग्राहकांना देखील फॅमिली हॉटेल कोणते बियर बार कोणते कळेनासे झाले आहे. शासनाच्या नियमानुसार फॅमिली हॉटेल मध्ये केवळ फॅमिली ला जेवणासाठी परवानगी व तसा परवाना दिलेला असतो.परंतु हॉटेल चालक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून आर्थिकहित जोपासून असे करण्यास परवानगी देत आहेत.यामुळे हॉटेल चालकाचे देखील फावते असून दारू पिणाऱ्या कडून दाम दुप्पट मिळत असल्याने असले प्रकार गंगापूर पोलीस स्टेशनमधील हद्दी मध्ये सरांस सुरू आहे. असलाच प्रकार फॅमिली हॉटेल तिखट पाहुणचार मध्ये सरास सुरू आहे.या हॉटेलमध्ये कोविड १९ च्या खरबरदारी घेतले जाणारे सर्व नियम धाब्यावर बसवून फॅमिली कमी मात्र मद्यपान करणारे मद्यपी अधिक वेटिंग ला होते जागा मिळवण्यासाठी असे दिसून आले.
सातपूर : १.गंगापूर रोड वरील एक फॅमिली हॉटेलमध्ये सुरू असलेला अनधिकृत बियर बार
औद्योगिक परिसर असल्याने, मोठ्या प्रमाणात कामगार,व्यापारी,उद्योजक, व्यावसायिक वास्तव्यास आहे. गंगापूर रोड फॅमिली हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गंगापूर रोड सारख्या रहदारीच्या ठिकाणी असून देखील पोलिसाच्या नजरेतून असे अनधिकृत हॉटेल व्यवसायिक सुटत असल्यामुळे त्रस्त नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धती वर शंका उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर आनंदवली पोलीस चौकी व गंगापूर पोलीस स्टेशन असून देखील अशा रीतीने अनधिकृत पणे फॅमिली हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्याच्या संख्येत वाढ होत असल्याने, पोलीस प्रशासन काय करत आहे ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. रात्री ११ पर्यंत हॉटेल आतून सुरू राहतात.या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गंगापूर रोड सारख्या स्मार्ट रोडवरील फॅमिली हॉटेलमध्ये मद्यपीना दारू पिऊन देणे कायदेशीर नसून यामुळे हॉटेल मध्ये जेवणासाठी आलेल्या फॅमिलीला त्रास होत असतो.अशा प्रकारे अनधिकृत पणे बियरबार सारखा व्यवसाय करीत आहेत यांच्या वर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे गंगापूर पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे.तसेच नाशिक मनपा,अन्न प्रशासन अधिकरी व महसूल विभागाने देखील याकडे गांभीर्याने याकडे बघावे – सुनील शिंदे, ग्राहक
सातपूर :२. सदर हॉटेल मध्ये आढळून आलेल्या दारूच्या बाटल्या
