सातपूर :नाशिक मिरर वेबटीम  : येथील जिजामाता मनपा शाळा क्र.२८  चे  पदवीधर शिक्षक सुरेश खांडबहाले ,  मनपा शाळा क्र.२७ चे पदवीधर शिक्षक योगेश सूर्यवंशी यांना रोटरी क्लब ऑफ नाशिक यांचे वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड   मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार केंद्रप्रमुख नितीन देशमुख, मुख्यध्यापिका छाया गोसावी, यांचे  हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी यशवंतराव जाधव, सोनजी गवळी, सचिन चिखले, शांताराम देवरे, सुनिल पवार, सोनिया बोरसे, शारदा सोनवणे उपस्थित होते. मनपा शिक्षण विभागातील शिवाजी शिंदे( मनपा शाळा क्र २४) गायत्री सोनवणे( मनपा शाळा क्र १० पंचवटी),शारदा घुले (मनपा शाळा क्र.२५ ) यांनाही नेशन बिल्डर ऑफ अवॉर्ड देण्यात आला.मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर  यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

बातम्या

Don`t copy text!