नाशिक मिरर : येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे होणारा भवानी माता यात्रा उत्सव अर्थात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या वर्षी वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे रद्द होत असल्याची माहिती सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली.
सातपूर पोलिस ठाण्यात आयोजित या बैठकीत समस्त सातपूर गावातील ग्रामस्थ गावकरी, वर्षानुवर्ष भवानी यात्रा उत्सवात बारा गाड्या ओढण्याचा मान व घराण्याची परंपरा असलेल्या निगळ परिवार,स्वीकृत नगरसेवक विजय भंदुरे,शिवसेनेचे योगेश गांगुर्डे, शांताराम निगळ.पोलिस पाटील राजाराम निगळ,गणेश निगळ,सचिन घाटोळ, गणेश गांगुर्डे, अरुण काळे,मंगेश निगळसह ग्रामस्थ उपस्थित होते.
येत्या १३ एप्रिलला होणारी भवानी यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रद्द करण्यात आल्याने सार्वजनिक सण,उरुस यात्रा, कुस्त्या, मिरवणूक,मनोरंजन कार्यक्रम तसेच क्रिडा व विविध स्पर्धा या काळात भरवू नयेत याचप्रमाणे जमावबंदीचा आदेश असल्याने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये याची आयोजकांनी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिस निरिक्षक मोरे यांनी केले.
