नाशिक विभागातील स्थलांतरित व परप्रांतीय कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी करा – गुलाबराव दाभाडे, कामगार उपायुक्त

नाशिक मिरर :  कोविड -१९ विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ब्रेक दि चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनांक ०४ एप्रिल रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत . त्यानुसार कामगार आयुक्त , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी दिनांक ०५ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेश व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे नाशिक जिल्हयातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारां करीता कामगार उपआयुक्त नाशिक विभाग , नाशिक यांचे कार्यालय , सातपुर येथे आंतरराज्य कामगार समुपदेशन / सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले असुन सु . तु . शिर्के सहाय्यक कामगार आयुक्त , नाशिक यांची केंद्रप्रमुख म्हणुन व उपकेंद्र प्रमुख म्हणुन म.ज.सुर्यवंशी , सरकारी कामगार अधिकारी , नाशिक यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच सरकारी कामगार अधिकारी मालेगाव कार्यालयाकरीता वि.प.पाटील दुकाने निरीक्षक श्रेणी -२ मालेगांव , सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय तिरुपती कॉल्पेक्स मोसम पुल , सटाणा रोड , मालेगांव यांची केंद्र प्रमुख म्हणुन नियुक्ती केलेली आहे . मालेगाव कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मालेगाव , सटाणा , देवळा या तालुक्याचा समावेश आहे . नाशिक जिल्हयातील विविध आस्थापना व कारखान्यामध्ये काम करीत असलेले स्थलांतरीत व परप्रांतीय कामगार लॉक – डाऊन मुळे त्यांच्या मुळगावी मुळ राज्यात जात असल्यास सदर कामगारांनी त्यांचे नांव , पत्ता , मोबाईल क्रमांक , आधार कार्ड क्रमांक , आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती या कार्यालयाच्या ई – मेल- dycinsk@yahoo.in यावर पाठविण्यात यावी . तसेच परराज्यात काम करीत असलेले नाशिक जिल्हयातील कामगार हे लॉकडाऊन मुळे नाशिक जिल्हयात मुळ गावी परत आलेले व येत असल्यास सदर कामगारांनी देखील त्यांचे नांव , पत्ता , मोबाईल क्रमांक , आधार कार्ड क्रमांक जन्म तारीख , आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती या कार्यालयाच्या ई – मेल dycinsk@yahoo.in यावर पाठविण्यात यावी . स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांकरीता मोफत टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा तसेच स्थलांतरीत कामगारांना अडचणी किंवा प्रश्न असल्यास , कार्यालयातील सु.तु.शिर्के , केंद्र प्रमुख यांच्याशी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२५३-२३५१७९ ७ या क्रमांकावर व वरील पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक विभागाचे कामगार उप आयुक्त गुलाबराव दाभाडे यांनी केले आहे .

बातम्या

Don`t copy text!