पोलिस आयुक्त व मनपा आयुक्तांची तातडीने पाहणी दौरा
नाशिक मिरर वेबटीम :
सातपूरच्या सावरकरनगर परिसरात एकाच गल्लीमध्ये धक्कादायकपणे २७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.सदर परिसर बेरीगेटिग करून सील करण्यात आला आहे. सदर हाॅटस्पाॅटला ७ एप्रिल रोजी सायंकाळी पोलिस आयुक्त दिपक पांडे,मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला व स्थानिक पोलीस व मनपा प्रशासनास आवश्यक त्या सूचना केल्या.
बागूल ड्रायव्हिंगसमोरील रस्त्याने नवजीवन हाॅस्पिटलशेजारच्या गल्ली मध्ये २७ कोरोना रुग्ण आढळले. त्यातील तिघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे सदर परिसर सातपूर मधील हॉटस्पॉट झाला आहे.यामुळे सातपूर मधील नागरिकांनी अधिक काळजी घेऊन सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे. यावेळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त विजय खरात, अशोक नखाते,वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, तसेच मनपा चे इतर अधिकारी उपस्थित होते. हा परिसर कन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
