हरकती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

 

नाशिक मिरर  : सातपूर विभागातील प्र.क्रं.९ मधील पिंपळगाव बहुला शिवारात नाशिक महानगरपालिकेच्या निधीतून प्रशस्त अशी शाळा बांधण्यात आली आहे.सदर शाळेचे नामकरण शिव छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय देण्यात आले आहे. सदर शाळेचे उद्घाटन होणे अजून बाकी आहे.शाळेचे नामकरण झालेले असून देखील
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण कै. अनुसया आई धर्माजी पाटील म्हणून करण्याबाबत महासभेत प्रस्तावित केले आहे.याबाबत २६ मार्च रोजी नोटीस प्रसिद्ध झाली असून, या नामकरणास प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर व माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी हरकत घेतली आहे.याबाबत लेखी निवेदन दि.५ एप्रिल रोजी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहे.

 

प्रभागात सर्व जाती धर्मांचे लोक एकोप्याने राहत असून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव कोणा लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीच्या नावाने करण्यात येऊ नये अशी भूमिका हरकतदारांनी व्यक्त केली आहे.

सद्यस्थितीत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे नाव दिलेले आहे .तसेच उर्वरित राहिलेल्या एक प्रवेशद्वाराला हेच नाव कायमस्वरूपी करावे किंवा महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक, समाजसुधारक यांचे नाव देण्यात यावे मागणी करण्यात आले आहे.तरी सदर प्रस्तावित नामकरण मंजूर न करता त्यास इतर प्रवेशद्वारस दिलेले नाव अथवा थोर महापुरुष, क्रांतिकारक,संत,समाज सुधारक यांचे नाव देण्यात यावे.सदर नावदेण्याबाबतच्या हरकत सुनावणीस आम्हास बोलविल्या शिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, लोकप्रतिनिधींच्या दबावात निर्णय घेतल्यास आपण जबाबदार अधिकारी म्हणून आपण व्यक्तीशा जबाबदार असाल असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदन देते वेळी माजी नगरसेवक सदाशिव माळी, सविता करण गायकर,महेश आहेर, कल्पेश कांडेकर,आदीं उपस्थित होते.

Don`t copy text!