पिंपळद नाशिक मिरर वृत्तसेवा: मागिल आठवड्यातनाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत आप्पा गाेडसे यांनी पिंपळद व ना.पंचक्रोशीतील विल्होळी, राजुर, सारुन आदी गावांतील परतीच्या अतीव्रृष्टी विध्वंसकारी पावसामुळे झालेल्या शेतकर्यांच्या शेतमालाचे नुकसान पहानी करून तातडीने प्रशासकीय अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकांमध्ये विशेषतः दा़क्षबाग, भात,टमाटे,साेहिबीन आदी अत्यावश्यक पिकांचा समावेश आहे.सदर पहाणी दौऱ्यात विविध गावांमधील सरपंच,ऊप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विस्तार आधीकारी,आणी सामाजिक कार्यकर्ते अशोक फडोळ, सदानंद नवले, विलास कड,पोलीस पाटील पिपळद सोमनाथ बेझेकर भाऊसाहेब झोंबाड हे उपस्थित हाेते.

