मालेगाव : नाशिक मिरर मुंबई – आग्रा महामार्गावर पाटणे फाट्यावर टोमॅटोची वाहतूक करणारा पिक अप पलटी झाला. परिणामी काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती. सुदैवाने जीवितहानी टळली.
टेहेरे गावाजवळील पाटणे फाटा येथे रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक दिशेकडून पिकअप गाडी येत होती. क्रॉसिंग ठिकाणी अचानक दुसरे वाहन आल्याने ते वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक लावले. त्यात हेलकावे खाऊन वाहन पलटल्याची चर्चा आहे. मार्गावर टोमॅटोचा खच पडला. गर्दी झाली. वाहतूक मंदावली. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टोईंग वॅनने अपघात ग्रस्त वाहन बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या ठिकाणी बघ्याच्या गर्दीत चोरट्यांनी काही मोबाईल लंपास केल्याचे बोलले जाते. त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
