नाशिक मिरर :

सातपूर येथील नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती समोर पंधरा दिवसापुर्वी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच सदर ठिकाणी आज सोमवार दिनांक १० जुलै दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने धडक दिली.यामध्ये एका युवकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी की, दुचाकीवरून पिंपळगाव बाहुला,नाशिक वरून त्र्यंबकच्या दिशेने कमलाकर पांडुरंग पारधी (वय ३०), ललिता कमलाकर पारधी (वय२७), विद्या कमलाकर पारधी (वय ७ वर्ष ),तनिष्क कमलाकर पारधी( वय ४ वर्ष) सर्व राहणार पिंपळगाव बाहुला,सातपूर नाशिक हे कुटुंब जात होते. याचवेळी त्र्यंबकेश्वर वरून नाशिककडे भरधाव वेगात येणारी स्विफ्ट कार (एमएच १५ ईएक्स ६४३१) चा टायर फुटला विरुद्ध दिशेने जाऊन व हॉटेल संस्कृती समोर येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिली.यामध्ये दुचाकी चालक कमलाकर पांडुरंग पारधी यांच्या डोक्याला जबरमार लागला. त्यामुळे कमलाकर यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर ललिता यांच्यासह दोन मुलावर उपचार सुरू आहेत. सदर ठिकाणी २५ जून रोजी देखील चारचाकी टायर फुटून दोन युवकांचा मृत्यू झाला होता.नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड वर अपघाताची मालिका सुरूच असून अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

बातम्या

Don`t copy text!