आठदिवस नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनाची पर्वणी

दि.१९ जुलै रोजी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन

नाशिक मिरर वृत्तसेवा :    येथील श्रमिकनगर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिन व श्री सावता महाराज यांचा समाधी सोहळा निमित्ताने दिनांक १३ जुलै ते २० जुलै पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह,शिवमहापुराण,अधिकमास कथा आयोजन करण्यात आलेले आहे.आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
आठ दिवस दु.२ ते ५ शिवमहापुराण, अधिकमास कथा, कथा प्रवक्ते ह.भ.प सोपान महाराज रावळकर सांगणार आहेत. सायं ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन आयोजन करण्यात आले आहे.
दि.१३ जुलै रोजी ह.भ.प.सुनीता ताई कातोरे संगमनेर , दि.१४ जुलै रोजी शिवा महाराज बावस्कर,दि.१५जुलै विशाल महाराज खोले, दि.१६ जुलै रोजी संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने सोपान महाराज सोनवणे यांचे सकाळी ९ ते १२ कीर्तन, तर रात्री रोजप्रमाणे समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन, दि.१७ जुलै रोजी गोपाल महाराज संजोरीकर, दि.१८ रोजी वासुदेव महाराज सोनवणे, दि.१९ रोजी ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), दि.२० रोजी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ होईल.भाविकांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होईल.

 

परिसरातील सर्व भाविकांनी कीर्तन सोहळाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सावता माळी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी संत सावता महाराज मंदिर समिती अध्यक्ष श्रीराम मंडळ व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!