अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या आयोजन

नाशिक मिरर वृत्तसेवा :

येथील अशोकनगर मधील पवार संकुल मध्ये श्री कृष्ण मंदिरा मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने दि.३१ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मा.नगरसेविका इंदूबाई नागरे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर ग्रंथ, वीणा व ध्वजपूजन करून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३ श्रीमद संगीतमय भागवत कथा दु.२ ते ५ पर्यंत भागवत कथा वाचक ह.भ.प श्री सोपान महाराज रावळगावकर सांगणार आहेत.तर सकाळी ८ ते ११ ह.भ.प तुळशीराम महाराज जाधव ज्ञानेश्वरी व्यासपीठाचे नेतृत्व करणार आहेत.

दि.३१ ऑगस्ट रोजी ह.भ.प सुनीता ताई कातोरे दि.१ सप्टेंबर रोजी शीतलताई तुपे यांचे कीर्तन संपन्न झाले.कीर्तन सेवा रात्री ८ ते १० असणार आहे.

तर २ सप्टेंबर रोजी श्री.श्री.१००८ ह.भ.प.महामंडलेश्वर अनंतदास महाराज बोरसे, ३ सप्टेंबर रोजी श्री.श्री.१००८ ह.भ.प.महामंडलेश्वर सूर्यभाननंदजी महाराज , ४ सप्टेंबर रोजी युवा कीर्तनकार दिंगबर महाराज किरकोडे, ५ सप्टेंबर रोजी देवगोपालजी महाराज शास्त्री, दि.६ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव कीर्तन ह.भ.प श्री सोपान महाराज रावळगावकर ,दि.७ रोजी स.९ ते ११ ह.भ.प श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद ने सप्ताह समाप्ती होणार आहे. दि.६ सायं.५ वाजता परिसरातुन भव्य पालखी मिरवणूक, सायं.७ वाजता दीपोत्सव होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प तान्हाजी दगडू पवार , सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.कीर्तन, भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तान्हाजी पवार यांनी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!