नाशिक मिरर वृत्तसेवा :
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड वर उज्वल एजन्सी जवळील चौकात खाजगी बस व दुचाकी धडक होऊन दुचाकीचालक युवक जागीच ठार झाला आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खाजगी बस एमएच १५ जेसी ०९०९ या वाहनांची, पल्सर एमएच १५ एफपी ५१५१ या दुचाकीची जोरदार धडक झाली.यामध्ये दुचाकी चालक वैभव मच्छिंद्र देशमुख (वय २८ रा.हनुमान मंदिर,श्रमिकनगर) यास डोक्याला जबरदस्त मार लागून जागीच ठार झाला.

                  वैभव हा इंजिनिअर असून सातपूर औद्योगिक वसाहती मधील खाजगी कंपनीत कामास होता. त्र्यंबकरोड वरून घरी परतत असताना अपघात झाला.श्रमिकनगर परिसरातुन नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युवकांच्या डोक्यात हेल्मेट असते तर युवकाचे प्राण वाचले असते अशी चर्चा होती.कारण युवकाला केवळ डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. अपघाताची माहिती समजतात सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करण्यासाठी दाखल झाले होते.खाजगी बस सह बसचालकास सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या

Don`t copy text!